अमरावती: अचलपूर तालुक्यातील पथ्रोट परिसरातील मौजा मलकापूर येथील पयशादेव शिवारात शेतकरी अरुण पटोकार यांनी नऊ एकरातील संत्राबागेवर कुऱ्हाड चालविली. या बागेतील तब्बल ८०० झाडे त्यांनी तोडली. अज्ञात रोगाने उत्पादन संकटात आले असल्याने हे महागडे पीक उशाशी साप ठेवण्यासारखे असल्याची जळजळीत प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
नागपूर, अमरावती जिल्ह्यातील काही भागात संत्रापीक चांगले घेतले जात असल्याने अचलपूर, चांदूर बाजार, मोर्शी, वरुड, काटोल, नरखेड, सावनेर या भागांना विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखले जायचे. मात्र, हल्ली अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव, तसेच रास्त बाजारभाव संत्रा पिकास मिळत नसल्याने या परिसराला संकटाचे ग्रहण लागले. संत्रा पीक परवडेनासे झाल्याने बागायतदार संत्रा झाडांवर कुन्हाड चालवत असून पर्यायी पिकांकडे ते वळत आहेत. त्यांचाच कित्ता अरुण पटोकार यांनीही गिरवला.
पटोकार यांच्याकडे एकूण २२ एकर शेतीत संत्राबाग आहे. काही वर्षांपासून सिंचनाकरिता मुबलक पाणी असून, व्यवस्थित औषध फवारणी, रासायनिक खत व्यवस्थापन सांभाळूनही अज्ञात रोगाच्या प्रादुर्भावाने डहाळ्या वाळणे, बागायतदार संत्रा झाडांवर कुऱ्हाड चालवत असून पर्यायी पिकांकडे ते वळत आहेत. त्यांचाच कित्ता अरुण पटोकार यांनीही गिरवला.
पटोकार यांच्याकडे एकूण २२ एकर शेतीत संत्राबाग आहे. काही वर्षांपासून सिंचनाकरिता मुबलक पाणी असून, व्यवस्थित औषध फवारणी, रासायनिक खत व्यवस्थापन सांभाळूनही अज्ञात रोगाच्या प्रादुर्भावाने डहाळ्या वाळणे, वाढ खुंटणे, फळांचा निकृष्ट दर्जा आदी लक्षणे विकसित झाली आहेत. त्यातच योग्य बाजारभाव मिळत नसल्याची बाब अलाहिदा. तसेच नैसर्गिक आपत्तींना तोंड देताना मेटाकुटीस आलेल्या या शेतकऱ्याने ८०० संत्रा झाडे तोडण्यासाठी लाकूड व्यापाऱ्यांना दिली. परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात हीच समस्या असल्याचे पुढे आले आहे.
झाड ९० रुपये प्रत्येकी
लागवडीएवढेही उत्पादन मिळत नसल्याने ९० रुपये प्रतिझाड दराने अरुण पटोकार यांनी दिली. प्रत्येक झाडापासून ५ क्विटल जळावू लाकूड मिळते. तथापि, स्वतः तोडले, तर त्यापेक्षा जास्त खर्च आला असता, अशी व्यथा पटोकार यांनी मांडली.
खरेदीला मुदतवाढ मिळताच पांढरे सोने पुन्हा चकाकले, मिळाला विक्रमी भाव