Homeताज्या बातम्याकांद्याचे पैसे मिळत नसल्याने संताप! 'या' बाजार समितीला टाळे ठोकण्याचा इशारा

कांद्याचे पैसे मिळत नसल्याने संताप! ‘या’ बाजार समितीला टाळे ठोकण्याचा इशारा

नाशिक : वारंवार पाठपुरावा करूनही शेतकऱ्यांचे कांद्याचे पैसे देण्यास टाळाटाळ करून बाजार समितीचे पदाधिकारी, सचिव यांच्यासह संबंधित कांदा व्यापारी यांनी शेतकऱ्यांची मोठी आर्थिक पिळवणूक केली असून, येत्या आठ दिवसांत बाजार समितीने शेतकऱ्यांचे कांद्याचे सर्वच्या सर्व थकीत पैसे अदा न केल्यास संबंधित कांदा उत्पादक शेतकरी सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरच उपोषण करतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी निवेदनाद्वारे दिला.

गेल्या दोन वर्षांपूर्वी सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत श्री माऊली तुपे आणि कंपनी या फर्मच्या माध्यमातून कांदा व्यापारी दीपक तुपे यांनी शेतकऱ्यांचा लिलाव पद्धतीने खरेदी केलेल्या कांद्याच्या रकमेपैकी काही शेतकऱ्यांचे सुमारे ६० ते ७० लाख रूपये अजूनही न दिल्याने संतप्त कांदा उत्पादकांनी गुरुवारी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीच्या कार्यालयात धडक देत प्रशासक व सचिव यांना लेखी पत्र देऊन आक्रमक भूमिका घेतली. यावेळी तालुक्यातील वेगवेगळ्या गावांतील कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

दोन वर्षे होऊनही आणि शेतकऱ्यांनी सतत बाजार समितीत सभापती, सचिव संचालक मंडळ यांच्याकडे पाठपुरावा करूनही थकवलेल्या रकमेपैकी मोजक्याच शेतकऱ्यांचे थोडेफार पैसे देऊन व्यापाऱ्याने संपूर्ण पैसे देण्यास चालढकल करत असताना बाजार समितीने मात्र फक्त बघ्याची भूमिका घेऊन शेतकऱ्याऐवजी व्यापाऱ्यालाच मदत केल्याचा आरोप या वेळेस कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिघोळे यांच्याकडे केला. संतप्त शेतकऱ्यांकडून बाजार समितीचे सचिव विजय विखे यांना या विषयाचे लेखी पत्र देण्यात आले.
लातूरच्या बाजार समितीत शेतमालाची आवक घटली

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Recent Post