तांदळाच्या किमतीत वाढ! साखर, गव्हानंतर आता पिठाच्या निर्यातीवरही बंदी येण्याची शक्यता

wheat farmer
Photo: Social media

नवी दिल्ली : देशभरात गव्हाच्या किमती वाढत असून, निर्यातीवरही बंदी घालण्यात आली आहे. असे असताना सरकार आता गव्हाच्या पिठावरही बंदी घालण्याचा विचार करत आहे, तर तांदळाच्या निर्यातीवर बंदी येण्याच्या शक्यतेने बांगलादेशने जूनमध्येच मोठ्या प्रमाणात आयात सुरू केली आहे. त्यामुळे तांदळाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.

बांगलादेशने तांदूळ आयातीवरील सीमा शुल्क ६२.५ टक्क्यांनी कमी केले आहे. त्यामुळे भारतात तांदळाची किंमत पाच दिवसांमध्ये १० टक्क्यांनी वाढली आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात किमती ४ टक्क्यांपेक्षा अधिक वाढून ३६० डॉलर प्रती टनवर पोहोचल्या आहेत. किमती वाढल्याने पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशमधून येणाऱ्या तांदळाची किंमत २० टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

गहू निर्यात बंद झाल्यानंतर व्यापारी चुकीच्या पद्धतीने पिठाची निर्यात करत आहेत. यामध्ये दोन पट वाढही झाली आहे. अर्थ मंत्रालयाने म्हटले की, प्रत्येक महिन्याला एक लाख टन पिठाची निर्यात होत आहे, तर गेल्या वर्षी पूर्ण आर्थिक वर्षात केवळ पाच लाख टन पिठाची निर्यात झाली.

किमती वाढण्याची कारणे…

सप्टेंबर-ऑक्टोबर ऐवजी बांगला देशने प्रथमच जूनमध्येच भारतातून तांदूळ आयात करणे सुरू केले आहे. भारत गव्हाप्रमाणेच तांदळावरही बंदी घालण्याचा विचार करू शकतो, अशी भीती बांगलादेशला आहे. बांगलादेशने तांदूळ आयात शुल्कात ३७.५% ची कपात केली असून, यामुळे भारतीय व्यापारी मोठ्या प्रमाणात तांदूळ बांगलादेशला निर्यात करत आहेत.

३६० डॉलर प्रति टन भारताच्या बासमती नसलेल्या तांदळाची किमत आंतरराष्ट्रीय बाजारात आहे. पाच दिवसांपूर्वी ही किमत ३४५ डॉलर होती.
सीताफळाचा हंगाम बहरला; दररोज चार ते पाच टन एवढीच आवक