मुंबई : पुत्रप्राप्तीमुळे राजस्थानचा फलंदाज शिमरोन हेटमायर वेस्ट इंडीजला रवाना झाला आहे. हेटमायर सोबत नेहमीच असू, त्याला प्रत्येक प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न आहे. जीवनातील सर्वात गोड क्षणांसाठी त्याला आणि पत्नी निर्वाणीला शुभेच्छा, असे राजस्थानने ट्विटमध्ये म्हटले आहे.
मुलाच्या जन्मानंतर हेटमायर पुन्हा १५ व्या हंगामातील उर्वरित सामने खेळण्यासाठी दाखल होईल, अशी आशा राजस्थान संघ व्यवस्थापन बाळगून आहे. हेटमायर पुन्हा परतल्यास त्याला जैव सुरक्षा कवचनुसार किमान तीन दिवस विलगीकरणात वास्तव्य करावे लागेल.
हेटमायरने यंदाच्या हंगामातील ११ सामन्यांत ७२.७५ च्या सरासरीने २९१ धावा काढल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक ५९ धावांचा समावेश आहे. गुणतक्तात १४ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर उभ्या असलेल्या राजस्थानने गत सामन्यात पंजाबला मात दिली होती. त्यांचा पुढील सामना दिल्लीविरोधात असेल.