Homeताज्या बातम्यादिल्लीत तीन मजली इमारतीला भीषण आग; २७ जणांचा होरपळून मृत्यू

दिल्लीत तीन मजली इमारतीला भीषण आग; २७ जणांचा होरपळून मृत्यू

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील मुंडका मेट्रो रेल्वे स्थानकावरील व्यावसायिक इमारतीला शुक्रवारी लागलेल्या भीषण आगीत २७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. आगीत १२ जण जखमी झाले असून ६०-७० जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते. तसेच इमारतीत आणखी काही जण अडकल्याची भीतीदेखील व्यक्त केली जात आहे.

पश्चिम दिल्लीतील मुंडका मेट्रो रेल्वे स्थानकावरील व्यावसायिक तीन मजली इमारतीत शुक्रवारी दुपारी ४.४० वाजता आग लागली. अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आल्यानंतर शर्थीचे प्रयत्न करत आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. इमारत व्यावसायिक असल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याचे सांगण्यात आले.

रात्री १० वाजता सुमारे २७ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर १२ जणांना जखमी अवस्थेत उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आली नव्हती. २४ अग्निशमन दलाचे बंब आग विझवण्याचे प्रयत्न करत होते. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
उरणच्या किनाऱ्यावर आढळल्या स्फोटकसदृश नळकांड्या

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Recent Post