Homeताज्या बातम्याभारतात गव्हाच्या निर्यातीवर सशर्त बंदी, मागणी असतानाही सरकारचा मोठा निर्णय

भारतात गव्हाच्या निर्यातीवर सशर्त बंदी, मागणी असतानाही सरकारचा मोठा निर्णय

India Bans Exports of Wheat: देशांतर्गत बाजारात गव्हाचे दर वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीवर सशर्त बंदी घातली आहे. देशांतर्गत बाजारात गव्हाच्या वाढत्या किमती पाहता सरकारने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, काही अटींसह गव्हाची निर्यात सुरू राहणार आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय आधीच करार झालेल्या निर्यातीला लागू होणार नाही. यासंदर्भात सरकारने अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेत केंद्र सरकारने म्हटले आहे की, भारत, शेजारी देश आणि इतर देशांमध्ये अन्न सुरक्षा धोक्यात आली आहे.

देशाच्या एकूण अन्नसुरक्षेचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि शेजारी आणि इतर असुरक्षित देशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. भारत सरकार शेजारी आणि इतर असुरक्षित विकसनशील देशांच्या अन्न सुरक्षा गरजा पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहे, ज्यांचा जागतिक गहू बाजारातील अचानक बदलांमुळे विपरित परिणाम होतो आणि गव्हाचा पुरेसा पुरवठा होऊ शकत नाही.

तत्पूर्वी, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी 15 एप्रिल रोजी एका ट्विटमध्ये म्हटले होते की, भारतीय शेतकरी जगाचे पोट भरत आहेत. इजिप्तने भारतातून गहू आयात करण्यास परवानगी दिली आहे. जगातील वाढती मागणी लक्षात घेता 2022-23 या आर्थिक वर्षात गव्हाची निर्यात 100 लाख (10 दशलक्ष) टन पार करेल.

आता देशात परिस्थिती बदलली आहे. एमएसपीपेक्षा जास्त दराने गव्हाची खरेदी आणि उत्पादनात घट यामुळे सरकारी खरेदीवर परिणाम झाला आहे. सरकारने आता गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. आजकाल बाजारात गहू किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त दराने विकला जात आहे.
शेती करायची की, सोडून द्यायची…? युध्दाचे कारण सांगून सरकारने शेतकऱ्यांना सोडले वाऱ्यावर

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Recent Post