ड्रॅगनला प्रतिकिलोला ३२० रुपयांचा उच्चांकी भाव; पुण्याच्या मार्केटयार्डात आवक

dragon fruit market
dragon fruit market

पुणे : पावसामुळे ड्रॅगनची आवक घटली असून बुधवारी (दि. १४) पुण्यातील मार्केटयार्डात ड्रॅगनला प्रतिकिलोला तब्बल ३२० रुपये इतका उच्चांकी भाव मिळाला.

बारामती तालुक्यातील माळेगावमधील शेतकरी विवेक तावरे यांच्या शेतातील ड्रॅगनला मार्केटयार्डात उच्चांकी भाव मिळाला. याबाबत व्यापारी सागर निकम म्हणाले, तावरे यांच्या २५ किलो ड्रॅगनची आवक झाली होती. त्यातील १६ किलो ड्रॅगनला ३२० रुपये तर ९ किलो ड्रॅगनला २०० रुपये भाव मिळाला आहे. सद्य:स्थिीतीत पावसामुळे ड्रॅगनच्या मार्केटयार्डातील आवकमध्ये लक्षणीय घट झाली आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर आवक वाढून दरही आवाक्यात येतील, असा अंदाज निकम यांनी व्यक्त केला.

विवेक तावरे म्हणाले, तीन एकर क्षेत्रात तीन वर्षांपूर्वी ड्रॅगनची लागवड केली. सरासरी १६० रुपये प्रतिकिलोला भाव मिळतो. मात्र, बुधवारी प्रतिकिलोला तब्बल ३२० रुपये भाव मिळाला. यंदा उत्पादन चांगले असून उत्पन्नही चांगले होईल, असा अंदाज आहे.
अखेर असे काय घडले की महाराष्ट्रातील शेतकरी नाफेड या सहकारी संस्थेचा ‘द्वेष’ करू लागले?