मुंबईत पावसाळ्यात २२ दिवस धोक्याचे; जून ते सप्टेंबर दरम्यान उसळणार मोठ्या लाटा

rains in Mumbai
Photo: Social media

मुंबई : यंदा पाऊस वेळेत व समाधानकारक कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत समुद्राला उधाण येणार असून २२ दिवस धोक्याचे असणार आहेत.

यादरम्यान मुंबईत पाणी साचण्याची शक्यता असल्याने पालिकेने आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. पूरस्थिती निर्माण झाल्यास एनडीआरएफसह लष्कराच्या तुकड्याही तैनात केल्या जाणार आहेत. पावसाळ्यात सुरुवातीला १३ जून रोजी हायटाईड असणार आहे. यादरम्यान समुद्रात ४.५६ मीटर उंच लाटा उसळतील. जूनमध्ये सहा दिवस आणि जुलैमध्येही सहा दिवस समुद्रात हायटाईड येईल. साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळल्या आणि त्याचवेळी पाऊस कोसळल्यास सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता असते.

त्यामुळे यावेळची स्थिती आव्हानात्मक असेल. याला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. त्यानंतर १५ जुलै रोजी समुद्रात सर्वाधिक लाटा उसळतील. जुलै महिना हा पावसाचा जातो. यावेळी हायटाईड असणार आहे. या दिवशी ४.८७ मीटर उंचीच्या लाटा उसळतील. तर ऑगस्टमध्ये ५ दिवस आणि सप्टेंबरमध्येही ५ दिवस समुद्रात लाटा उसळणार असल्याने सखलभागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. |
कांद्याच्या आधारभूत दराअभावी उत्पादक आर्थिक अडचणीत; तीन हजार रुपये हमीभावाची मागणी