मुंबई : जगातील २० हून अधिक देशांमध्ये मंकीपॉक्सचे सुमारे २०० रुग्ण आढळल्याची माहिती शुक्रवारी जागतिक आरोग्य संघटनेने दिली. ही रुग्णसंख्या पाहता हा एखाद्या रोगाचा उद्रेक म्हणता येणार नाही; मात्र वाढती रुग्णसंख्या गंभीर असून, या आजारावरील लसी आणि औषधांचा पुरेसा साठा करण्याची गरज आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.
मंकीपॉक्सची साथ नेमकी आली कशी, यासंदर्भात अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित असल्याचे डब्ल्यूएचओने सांगितले. प्रामुख्याने मध्य व पश्चिम आफ्रिकेपुरत्या मर्यादित असलेल्या मंकीपॉक्सचे युरोपीयन राष्ट्रांसह अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इस्त्रायलमध्ये रुग्ण आढळत आहेत. सध्या तरी या आजारीसाठी कारणीभूत विषाणूमध्ये जनुकीय बदल झालेला नाही.
त्यामुळे मानवाच्या वागणुकीत बदल झाल्यामुळे या साथरोगाचा संसर्ग वाढत चालल्याचे दिसते, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या महामारी व साथरोग विभागाच्या संचालक डॉ. सिल्वी ब्रायंड यांनी सांगितले. आफ्रिकन राष्ट्रांमध्ये मानवाला मंकीपॉक्सचा संसर्ग होण्यासाठी प्रामुख्याने जंगली प्राण्यांचे मांस भक्षण किंवा त्यांचा संपर्क हे प्रमुख कारण आहे, तर युरोपीयन देशांमधील संसर्गासाठी समलैंगिक संबंध कारणीभूत ठरत आहेत. स्पेनमध्ये मंकीपॉक्सचे सर्वाधिक ९८ रुग्ण आढळले असून, त्यांपैकी ९८ जण पुरुष आहे. रुग्णांमध्ये समलैंगिक पुरुषांची संख्या अधिक आहे.
– समलैंगिकांमुळे झाला मंकी पॉक्सचा फैलाव?