देशात १४% अधिक पाऊस, ४ राज्यांत फिरवली पाठ

rain
photo: social media

नवी दिल्ली: मान्सूनच्या आगमनाला ४५ दिवस पूर्ण झाले. एकीकडे आतापर्यंत देशात सरासरीच्या १४ टक्के अधिक पाऊस झाला तर दुसरीकडे झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये दुष्काळसदृश्य स्थिती आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या ३८ टक्के नागरिक याच चार राज्यांत राहतात.

देशात आतापर्यंत २९४.२ मिमी पाऊस पडायला हवा होता. मात्र, हा आकडा ३३५.२ मिमीवर गेला आहे. त्याचवेळी चार राज्यांकडे पावसाने पाठ फिरवली आहे. लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून सर्वांत मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात सरासरीच्या तब्बल ६५ टक्के कमी पावसाची नोंद झाली.

झारखंड मध्ये सरासरी चाळीस टक्के, बिहारमध्ये सरासरीच्या ४२ टक्के तर पश्चिम बंगालमध्येही सरासरीच्या २४ टक्के कमी पाऊस झाला. हवामान अभिलेखानुसार, विभागाच्या पासून १९०१ आतापर्यंत १२२ वर्षांच्या काळात १९७४ नंतर पावसाच्या असमान प्रमाणाची ही दुसरी वेळ आहे. हवामान खाते पावसाची ४ श्रेणींमध्ये नोंद करते. हलका (७.५ मिमीपर्यंत), मध्यम (७.५ ते ३५.५ मिमी), मुसळधार (३५.५ ते २४४.५) आणि अतिमुसळधार (२४४.५ मि.मी. हून अधिक). गेल्या ४५ दिवसांत हलका पाऊस १.६ टक्क्यांनी वाढला आहे. त्याचबरोबर मध्यम दर्जाच्या पावसात ८९ टक्के, मुसळधार पावसात २३.२ टक्के तर अतिमुसळधार पावसाच्या घटनांत १८६२ टक्के वाढ झाली आहे.

महाराष्ट्रात १०२ मृत्यू

मान्सूनच्या आगमनानंतर महाराष्ट्रात आतापर्यंत पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये १०२ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात तीन जण मृत्युमुखी पडले. गुजरातमध्ये गेल्या २४ तासांत १९ लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे तेथील पाऊस बळींची संख्या १०६ झाली आहे.

अनेक राज्यांत गंभीर परिस्थिती

  • महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, केरळ तसेच आसामच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस व पुरामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. गुजरातच्या नऊ जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
  • राजस्थानच्या श्रीगंगानगर येथे मुसळधार पावसानंतर मदत व २ बचाव कार्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे.
  • आसामात २.१० लाखांहून अधिक लोक पुराच्या वेढ्यात अडकले ३ आहेत. मध्य प्रदेशात १५ दिवसांपासून धो धो पाऊस सुरू असून, सरासरीच्या १८ टक्के अधिक पाऊस झाला आहे.
  • ४ गुजरातमध्ये कावेरी नदीला पूर आल्याने अनेक ठिकाणी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. कर्नाटकातील ३० पैकी १३ जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. बेळगाव, चिकमंगलूर आणि हासन जिल्ह्यांतील शाळांना सुटी देण्यात आली आहे.
  • मुसळधार पावसामुळे केरळच्या कासरगोड, कोझिकोड आणि ५ वायनाड जिल्ह्यांतील नद्यांना पूर आला असून, राज्य शासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

टर्फ लाईन भरकटली

  • कमी पाऊस झालेल्या उत्तर प्रदेश, झारखंड आणि बिहार राज्यात पीक उत्पादन घटणार आहे. या राज्यांतील शेतकरी सध्या अडचणीत आला आहे.
  • नऊ वर्षापूर्वी मान्सूनची टर्फ लाईन झारखंड, बिहारमधून गेली नव्हती. तेव्हा भोपाळ-गुजरातमध्ये धुवाधार पाऊस होत होता आणि झारखंड कोरडा होता. आता तोच ट्रेंड पाहायला मिळत आहे.
  • भोपाळ, गुजरात आणि महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरु आहे आणि झार खंडमध्ये आतापर्यंत सरासरीच्या ४९ टक्के कमी पावसाची नोंद झाली, असे एका तज्ज्ञाने सांगितले. टर्फ लाईन का भरकटते याचे कारण अस्पष्ट आहे, असेही हा तज्ज्ञ म्हणाला.

वळूमाता प्रक्षेत्राच्या बायोगॅसद्वारे होणार १० किलोवॅट वीजनिर्मिती